You are currently viewing कोणतेही कर्ज न घेता मुलांना उच्च शिक्षण कसे द्यावे ?

कोणतेही कर्ज न घेता मुलांना उच्च शिक्षण कसे द्यावे ?

         प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या लग्नाचा अधिक विचार  करत असतात. त्यासाठी पै न पै जमा करत असतात. काही वेळेला पैसे कमी पडले तर मुलांच्या शिक्षणसाठी व्याजाने पैसे काढतात. मुलांची लग्न करण्यासाठी कर्ज काढतात. आणि पुन्हा पुढील तीन ते चार वर्षे ते कर्जाचे हफ्ते भरत असतात. खालील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल कि, मुलांचं शिक्षण किंवा लग्नाचे शुभ कार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढण्याची गरज नाही. आपल्याच रकमेतून थोडी थोडी रक्कम जमा करून पंधरा ते वीस वर्षात आपण भली मोठी रक्कम जमा करू शकतो.      

आपण इथे पंचवीस वर्षांचा कालावधी गृहीत धरू. कारण हल्ली शिकलेली तरुण पिढी वयाच्या पंचवीस वर्षानंतर लग्न करतात. जर आपला मुलगा किंवा मुलगी १ वर्षाचे असतील तर आपल्या कडे पूर्ण पंचवीस वर्षे आहेत. जर ते पाच वर्षाचे असतील तर आपल्याकडे वीस वर्षे आहेत. जर ते दहा वर्षांचे असतील तर पंधरा वर्षे आहेत. जर ते पंधरा वर्षांचे असतील तर  दहा वर्षे आहेत, आणि जर ते वीस वर्षांचे असतील तर आपल्याकडे पाच वर्षे शिल्लक आहेत. पाच वर्षांचा कालावधी देखील फार मोठा आहे. जरी कमी कालावधी असला तरी काही चिंता करण्याची गरज नाही. या पाच वर्षात आपण फार मोठी रक्कम जमा करू शकता.    

प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या पगारातून आपण काही रक्कम जमा करत आहोत. आणि प्रत्येक वर्षी आपला पगार वाढत असतो त्यामुळे प्रतेक वर्षी आपण अधिक रक्कम जमा करत आहोत. ही रक्कम आपण बँकेत रिकरींग डिपॉजिट (RD) म्हणून जमा करत आहोत आणि आपल्या रकमेवर प्रत्येक वर्षी ८% किंवा ६% व्याज मिळेल असे गृहीत धरू.

    वर्षे १ ते ५  

 वर्षे प्रत्येक महिना प्रत्येक वर्षी एकूण रक्कम + व्याज ८% एकूण रक्कम
१,००० १२,००० १२,००० + ९६० १२,९६०/-
२,००० २४,००० २४,००० + १९२०  २५,९२०/-
३,००० ३६,००० ३६,००० + २८८० ३८,८८०/-
४,००० ४८,००० ४८,००० + ३८४० ५१८४०/-
५,००० ६०,००० ६०,००० + ४८०० ६४,८००/-
      एकूण रक्कम १,९४,४००/-

आपण पाच वर्षात व्याजासकट १,९४,४००/- एवढी रक्कम जमा करत आहोत. हीच रक्कम पुन्हा आपण पुढील पाच वर्षांसाठी बँकेत अमानत रक्कम (FD) वार्षिक ८% म्हणून जमा करत आहोत.  

   वर्षे ६ ते १०  

 वर्षे प्रत्येक महिना प्रत्येक वर्षी एकूण रक्कम + व्याज ८% एकूण रक्कम
६   ६,००० ७२,०००   ७२,००० + ५,७६० ७७,७६०
७   ७,००० ८४,०००   ८४,००० + ६,७२०  ९०,७२०
८   ८,००० ९६,०००   ९६,००० + ७,६८० १,०३,६८०
९   ९,००० १०८,००० १०८,००० + ८,६४० १,१६,६४०
१०    १०,००० १२०,००० १२०,००० + ९६०० १,२९,६००
      एकूण रक्कम ५,१८,४००,

 

 

आपण ६ ते १० या पाच वर्षात रु.५,१८,४००/- रक्कम जमा केली. त्याचप्रमाणे आपण १,९४,४००/- पाच वर्षासाठी FD केली होती. तिची व्याजसाहित अंदाजे रक्कम ३,५०,०००/- आली असे गृहीत धरू. म्हणजे आपण १ ते १० वर्षात जमा केलेली एकूण रक्कम –  

 ३,५०,०००/- + ५,१८,४०० = ८,६८,४००/-    

ही जमा झालेली रक्कम रु.८,६८४००/- पुन्हा आपण पुढील पाच वर्षासाठी वार्षिक ८% व्याजणे FD करत आहोत. 

 

 

   वर्षे ११ ते १५  

 वर्षे प्रत्येक महिना प्रत्येक वर्षी एकूण रक्कम + व्याज ६% एकूण रक्कम
 ११   ११,००० १,३२,०००   १,३२,००० + ७,९२०   १,३९,९२०/-
  १२   १२,००० १,४४,०००   १,४४,००० + ८,६४० १,५२,६४०/-
१३ १३,००० १,५६,०००   १,५६,००० + ९,३६० १,६५,३६०/-
१४ १४,००० १,६८,०००   १,६८,००० + १०,०८० १,७८,०८०/-
   १५    १५,००० १,८०,०००   १,८०,००० + १०,८००   १,९०,८००/-
      एकूण रक्कम ८,२६,८००/-

आपण ११ ते १५ या पाच वर्षात रु.८,२६,८००/- रक्कम जमा केली. त्याचप्रमाणे आपण ८,६८,४००/- पाच वर्षासाठी FD केली होती. तिची व्याजसाहित अंदाजे रक्कम रु.१५,००,०००/- आली असे गृहीत धरू. म्हणजे आपण १ ते १५ वर्षात जमा केलेली एकूण रक्कम – 

 १५,००,०००/- + ८,२६,८०० = २३,२६,८००/-  

ही जमा झालेली रक्कम रु.२३,२६,८००/- पुन्हा आपण पुढील पाच वर्षासाठी वार्षिक ८% व्याजणे FD करत आहोत.    

   वर्षे १६ ते २०  

 वर्षे प्रत्येक महिना प्रत्येक वर्षी एकूण रक्कम + व्याज ६% एकूण रक्कम
  १६     १६,००० १,९२,०००   १,९२,००० + ११,५२० २,०३,५२०/-
  १७     १७,००० २,०४,०००   २,०४,००० + १२,२४० २,१६,२४०/-
१८   १८,००० २,१६,०००   २,१६,००० + १२,९६० २,२८,९६०/-
१९   १९,००० २,२८,०००   २,२८,००० + १३,६८०   २,४१,६८०/-
   २०      २०,००० २,४०,०००   २,४०,००० + १४,४००  २,५४,४००/-
      एकूण रक्कम ११,४४,८००/-

आपण १६ ते २० या पाच वर्षात रु.११,४४,८००/- रक्कम जमा केली. त्याचप्रमाणे आपण २३,२६,८००/- पाच वर्षासाठी FD केली होती. तिची व्याजसाहित अंदाजे रक्कम रु.४५,००,०००/- आली असे गृहीत धरू. म्हणजे आपण १ ते २० वर्षात जमा केलेली एकूण रक्कम – 

 ४५,००,०००/- + ११,४४,८०० = ५६,४४,८००/- 

ही जमा झालेली रक्कम रु.५६,४४,८००/- पुन्हा आपण पुढील पाच वर्षासाठी वार्षिक ८% व्याजणे FD करत आहोत.    

   वर्षे २१ ते २५  

 वर्षे प्रत्येक महिना प्रत्येक वर्षी एकूण रक्कम + व्याज ६% एकूण रक्कम
   २१      २१,००० २,५२,०००   २,५२,००० + १५,१२० २,६५,१२०/-
   २२      २२,००० २,५४,०००   २,६४,००० + १५,८४०  २,७९,८४०/-
२३   २३,००० २,७६,०००   २,७६,००० + १६,५६० २,८२,५६०/-
२४   २४,००० २,८८,०००     २,८८,००० + १७,२८०     ३,०५,२८०/-
    २५       २५,००० ३,००,०००    ३,००,००० + १८,०००  ३,१८,०००/-
      एकूण रक्कम १४,५०,८००/-

 

 

आपण २१ ते २५ या पाच वर्षात रु.१४,५०,८००/- रक्कम जमा केली. त्याचप्रमाणे आपण रु.५६,४४,८००/- पाच वर्षासाठी FD केली होती. तिची व्याजसाहित अंदाजे रक्कम रु.१,००,००,०००/- आली असे गृहीत धरू. म्हणजे आपण १ ते २५ वर्षात जमा केलेली एकूण रक्कम – 

 १,००,००,०००/- + १४,५०,८०० = १,१४,५०,८००/- 

आपण पहिले कि, कोणत्याही प्रकारचे कर्ज न काढता आपल्याच रकमेतून थोडी थोडी रक्कम जमा करून भली मोठी रक्कम जमा केली.

मी व्यवसाय विषयक “व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा” हे E-book लिहिले आहे. त्यामध्ये देखील मी व्यवसाय वाढविण्यासाठी असे उदाहरण दिले आहे. ज्यांचा व्यवसाय आहे किंवा व्यवसाय करण्याची ईच्छा आहे, त्यांनी हे E-book नक्की वाचावे.

आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर कृपया आपण आपले नातेवाईक, मित्र, शेजारी यांना शेअर करा ज्यामुळे त्यांना देखील याचा फायदा होईल. आपल्या प्रतिक्रिया देखील नक्की लिहा. 

धन्यवाद!

रविंद्र वि. नागांवकर 

लेखक आणि संस्थापक 

www.adonads.net  

nagaonkarorg@gmail.com

WhatsApp No. 9867930853

 

* वर दिलेले गणित हे उदाहरण आहे. आपण आपल्या पद्धतीने रक्कम जमा करू शकता.  

 * प्रत्येक बँकेचे व्याजदर प्रत्येक महिन्याला वेगवेगळे असतात.

* रिकरींग डिपॉजिट (RD) व फिक्स्ड डिपॉजिट (FD) यांचे व्याज दर वेगवेगळे असतात.  

* आपल्या बँकेचे खाते सरकारी बँकेत उघडा.  

*  आयकर बाबत आपण आपल्या CA बरोबर बोलून घ्या.

 

 

माझी व्यवसायिक ईबूक बंडल 

१. व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा ?

२. बाराही महीने उत्पन्न देणारा सुकमेवाचा व्यवसाय कसा करावा ?

३. व्हॉटसअप मार्केटिंग 

४. ईमेल मार्केटिंग