१०० वर्षे निरोगी आयुष्य कसे जगायचे ?
आपण पाहतो की काही व्यक्ति अक्षरशा: वयाची शंभरी पार केलेले असतात. त्यांनी एवढी शंभर वर्षे आपल्या शरीराला कसे सांभाळले? त्यांनी कोणत्या शक्ति वर्धक गोळ्या घेतल्या, निरोगी राहण्यासाठी कोणते च्यवनप्राश घेतले, फिट आणि फाइन राहण्यासाठी कोणत्या पावडरचे सेवन केले. त्यांनी यापैकी काहीच केले नाही. तर ते आतापर्यंत फक्त घरचे ताजे व सकस अन्न खात आले आहेत. ते जसे शंभर वर्षे जगले तसे आपण ही जगू शकतो, कोणत्याही औषधे, पावडर किंवा गोळ्या न खाता. काही गोष्टींच्या नियमांचे पालन करणे फार गरजेचे आहे. तेव्हाच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.
- सकाळी लवकर उठा
पूर्वी लोक सकाळी चार वाजता उठत आणि आपल्या कामाला लागत. आपणही सकाळी लवकर उठले पाहिजे. सकाळी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे. लवकर उठल्यामुळे आपली कामे लवकर व पटापट होतातच शिवाय आणखी काम करण्याची ओढ लागते. त्यामुळे दिवस भरात आपण थकत नाही आणि अधिक काम केल्याचा आपल्याला अत्याधिक आनंद मिळतो. आनंद आपल्या शरीरसाठी संजीवनी आहे.
- सतत प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा
काही लोक मनाने फार हळवी असतात. त्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट चुकीची घडली की ते विनाकारण त्या गोष्टीचा विचार करत बसतात. एक झाली की दुसरी. ते आपल्या मनावर अशा अनावश्यक गोष्टींचा एवढा मोठा आघात करून बसतात की ते हळू-हळू निरुत्साही होत जातात. जर एखाद्या गोष्टीचे निरसन होत असेल तर विचार का करा आणि निरसन होतच नसेल तर विचारच का करा. विचार करत न बसता, आता आपण काय करू शकतो याचा विचार करा आणि त्या कामामध्ये गुंतवून जा. सतत कामात राहिल्यामूळे आपल्या मनात येणारे विचार कायमचे दूर होतील आणि आपण सतत प्रसन्न राहिल.
- दिवस भरात किमान ४ ते ५ कि. मी. चाला
दिवस भरात किमान ४ ते ५ कि. मी. चालण्याची सवय लावा. भरपूर चालल्यामुळे आपल्या शरीरातून घाम निघतो. त्यामुळे रक्तात असलेले अनावश्यक घटक घामावाटे शरीराच्या बाहेर फेकल्या जातात त्यामुळे आपले रक्त शुद्ध होते. त्याचप्रमाणे सतत चालल्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होत राहते व आपले शरीर तंदरूस्त राहते.
- दिवस भरात किमान ५ ते ७ लीटर पाणी प्या
बिसलरीचे फिल्टर केलेले शुद्ध पाणी आपण पितो. मग आपले शरीर शुद्ध कसे करायचे. आपले शरीर शुद्ध होण्यासाठी दिवस भरात किमान ५ ते ७ लीटर पाणी प्यायले पाहिजे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे आपले संपूर्ण शरीर फिल्टर होते. अन्न सेवन करताना काही विषारी घटक अन्नासोबत आपल्या शरीरात जातात. भरपूर पाणी प्यायल्यामुळे नको असलेले विषारी घटक मूत्रावाटे आपल्या शरीराच्या बाहेर फेकले जातात आणि आपले शरीर संपूर्ण शुद्ध होते.
- सतत ताजी फळे खा
सतत ताजी फळे खात रहा. आपल्या शरीलला आवश्यक असणारे घटक काही वेळा अन्नाद्वारे मिळत नाहीत. त्याची पूर्तता फळांमधूनच पूर्ण होते. व्हिटासिन सी, व्हिटासिन डी संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगाचा धोका कमी करण्यासाठी अधिक फळ खाणे हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. फळे अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्कृष्ट स्रोत आहेत आणि त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीला हृदयरोग, कर्करोग, जळजळ आणि मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. लिंबूवर्गीय फळे आणि बेरी रोग टाळण्यासाठी विशेषतः शक्तिशाली असू शकतात.
सतत बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळा
काही लोकांना सतत बाहेरचे अन्न पदार्थ खाण्याची सवय असते. बाहेरचे अन्न पदार्थ अर्धे कच्चे तर पुन्हा वापरलेल्या तेलात बनवलेले असतात. असे अन्न पदार्थ खल्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक तेल आपल्या शरीरात जाते. सतत अधिक तेल आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्या रक्तात तेलाचे प्रमाण वाढते आणि मग आपल्याला मोठ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. उदा. हृदयाचे, मेंदूचे किंवा इतर आजार. जमेल तेवढे घरचे सकस व ताजे अन्न पदार्थ खा आणि हृदयाला ईजा होणार याची काळजी घ्या. कारण हृदय आपल्या शरीराचे महत्वाचे यंत्र आहे.
- रोजच्या जेवणात तेलाचे प्रमाण कमी ठेवा
काही लोकांना नेहमी मटण व मासळी खाण्याची सवय असते. ते मासळीमध्ये एवढे तेल वापरतात की, मासळी ताटात वाढली तर ताटाच्या कडेकडेने तेल वहायला लागते. असे तेल जर आपल्या शरीरात नेहमी गेले तर रक्तात तेलाचे प्रमाण अधिक वाढते व अशा व्यक्तीला हृदयाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. पूर्वी फक्त भुईमुंगाचे तेल मिळत होते, आता रसायनयुक्त तेल मिळते. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये मटण व मासळी याचे सेवन न करता, पाले भाज्या, मोड आलेले कडधान्य व फळ भाज्या यांचा अधिक वापर करा. दररोज एक फळ खा माग ते केले असले तरी चालेल. रक्तात तेलाचे प्रमाण समतोल राहण्यासाठी शक्य होईल तेवढे तेलाचे प्रमाण फार-फार कमी ठेवा.
- धूम्रपान करू नका
काही लोकांना आपण पहिले असेल, त्यांच्या तोंडाला दुर्गंधी सुटलेली असते. अशी माणसे आपल्याला नको असतात. ते सतत धूम्रपान करत असतात. गुटखा, पान मसाला, सिगारेट, दारू, चरस, गांजा यांच्या एवढे आहारी गेलेले असतात की, सततच्या धूम्रपानामुळे त्यांचे शरीर फार आजारी व कमकुवत दिसते. त्यांना वेगवेगळे आजार जडलेले असतात. उदा. कॅन्सर, फुप्फुसाचे आजार त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, लिव्हर, किडनी व इतर अवयव निकामी होतात. धूम्रपानामूळे आपले आयुष्य अर्धे कमी होते. आयुष्य कमी होण्याचे हे सगळ्यात मोठे कारण आहे. म्हणून धूम्रपान करू नका, आपल्या शरीराला कोणताही आजार होऊ देऊ नका.
अशा पद्धतीने जर आपण आपला नित्य दिनक्रम ठेवला तर शंभर वर्षे जगण्याचा आनंद आपण लुटू शकतो.
ही माहीती फार उपयुक्त आहे, कृपया आपण आपल्या कुटुंब सदस्य, नातेवाईक, मित्र व शेजारी यांना शेअर करा. आणि माझा हा लेख आपल्याला कसा आवडला ते कमेंट करा व रेटिंग द्या.
धन्यवाद
रविंद्र नागांवकर
लेखक
WhatsApp No.9867930853
(* माझा अनुभव या लेखात मांडला आहे. माझ्या नित्य दिनक्रमामुळे व देवाच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आशिर्वादाने मी आजही फिट आणि फाइन आहे.)
![]() |
माझी व्यावसायिक ईबूक्स१. व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा |