You are currently viewing मराठी माणूस व्यवसाय का करत नाही ?

मराठी माणूस व्यवसाय का करत नाही ?

मराठी माणूस व्यवसाय न करण्याची बरीच कारणे आहेत. त्याची सुरवात प्रथम घरापासूनच होते –

बाळा खूप शिक, खूप मेहनत घे, मोठा हो, पण एक नोकरी धर.

व्यवसायाच्या भानगडीत पडू नकोस, आपल्याला व्यवसाय जमणार नाही.

आपल्या घराण्यात कोणी व्यवसाय केला नाही.

मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही.

व्यवसाय करायचा म्हणजे खूप मोठा ताप असतो .

व्यवसाय करायचा म्हणजे मोठा खर्च असतो .

व्यवसायात कधी पैसा मिळतो तर  कधी मिळत नाही, याची खात्री नसते.

व्यवसायमध्ये फार मोठा धोका असतो.

सतत धावपळ करावी लागते, दुकान नेहमी चालू ठेवावे लागते. आराम मिळत नाही.

पैसा अधिक आला की झोप लागत नाही.      

मग टाटा, बिर्ला, अंबानी हे काय देवाचे दुत आहेत. त्यांना त्रास झाला नाही का ? त्यांना सुद्धा बऱ्याचवेळा अपयश आले असेल, शिकस्त खावी लागली असेल. पण ते खचले नाहीत. अपयश का आले, याचा त्यांनी अभ्यास केला आणि झालेल्या चुका पुन्हा न करता व्यवसाय पुढे चालू ठेवला. मराठी माणसाला अपयश आले की तो खचून जातो, घाबरून जातो, निरुत्साही होतो आणि आपल्याला हे जमणार नाही म्हणत अर्ध्या मार्गातूनच तो माघार घेतो.   

EARN 60% INCOME WITH LESS WORK

त्यातच जुन्या म्हणींची भर पडली आहे.

१. हांतरूण पाहून पाय पसरावे.

२. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखा:चे.

३. ठेविले अनंते तैसेची रहावे.

४. दु:ख हाच आपला मित्र. 

 

या अशा अनेक कारणांमुळे मराठी माणूस व्यवसाय करण्याचे टाळतो. त्याला पैसा मिळण्याची खात्री नसते. नोकरी केली की महिन्याच्या शेवटी पगार मिळतो. नोकरीत फार त्रास नसतो. आठ तास काम करून घरी येता येते.  रविवारची सुट्टी असते. नोकरीमध्ये महिन्याच्या शेवटी पैसा मिळतो पण व्यवसायात नेहमी हातात पैसा खेळता राहतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरवातीला त्रास होतो एवढेच, एकदा का व्यवसायात जम बसला की आपोआप व्यवसाय वाढायला सुरवात होते आणि मेहनत करण्याची सवय लागते. व्यवसायमध्ये कितीही त्रास सहन केला तरी त्याची झळ बसत नाही, उलट हातात सतत पैसा खेळत राहिल्यामुळे आणखी पैसा कसा वाढवता येईल यासाठी मेहनत करण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत अधिकच वाढते. मराठी माणसाने व्यवसाय करणे ही आता काळाची गरज उरली आहे. भविष्यात कोरोना सारखा दूसरा कोणताही आजार पुन्हा उद्भवू शकतो. पुन्हा कित्येक नोकऱ्या बंद पडू शकतात. नोकरी गेली की पुन्हा नोकरी मिळेल याची खात्री नसते. परंतु अनुभवाच्या जोरावर व्यवसाय पुन्हा उभा करता येऊ शकतो. आणि व्यवसाय खेरीज त्यांना इतर काही सुचत नाही. तो पुन्हा व्यवसायाकडेच वळतो. कारण झालेले नुकसान तो व्यवसायमधूनच काढू शकतो याची त्याला पूर्णपणे खात्री असते.    

EARN 60% INCOME WITH LESS WORK (1)

नोकरी मिळण्यासाठी कित्येक मराठी माणसे लाखों रूपायांचे कर्ज काढतात कारण नोकरी म्हणजे आयुष्यभराची भाकरी अशी त्यांची समजूत असते, पण व्यवसाय आपले आयुष्य बदलून टाकणारे असते, हे त्यांना माहीत असूनही त्याकडे पाठ फिरवली जाते. नोकरीसाठी कर्ज काढतात, पण व्यवसायमध्ये दहा हजार गुंतविण्याची त्यांना खूप भीती वाटते. आपल्या घरातील कोणी व्यक्ती आजारी पडली की आपण त्यांना रुग्णालयात दाखल करतो. तिथे होणारा सर्व खर्च हा बुडीत खात्यात असतो. तो पुन्हा मिळणारा नसतो. हाच विचार आपण व्यवसाय बद्दल का करत नाही. व्यवसायामध्ये गुंतवलेले पैसे लगेच मिळत नाहीत. ते हळू-हळू मिळतात पण मिळतात.           

मराठी माणूस हा प्रामाणिक आहे. तो व्यवसाय देखील प्रामाणिकपणे करू शकतो, याचा त्यांनी जरूर विचार करावा. 

धन्यवाद!

रविंद्र नागांवकर

लेखक                                                                                                                           

www.adonads.net

nagaonkarorg@gmail.com

WhatsApp No.9867930853

Pink-Gradient-Thank-You-Instagram-Post-2

माझी व्यावसायिक ईबुक्स

. व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा 

. बाराही महीने उत्पन्न देणारा सुकामेवाचा व्यवसाय कसा करावा 

३. ईमेल मार्केटिंग 

४. व्हॉट्सअप मार्केटिंग   

५.यूट्यूब मार्केटिंग