You are currently viewing प्रचंड मागणी असलेला तेल उत्पादनाचा व्यवसाय सुरू करा.

प्रचंड मागणी असलेला तेल उत्पादनाचा व्यवसाय सुरू करा.

_www.arjunincensesticks.comखाद्यतेल म्हणजेच Edible oil चा प्रत्येक खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपल्या मूलभूत गरजांप्रमाणेच तेल ही एक अत्यावश्यक गरज बनली आहे. स्वयंपाकघरापासून ते छोट्या मोठया हॉटेल्समध्ये खाद्य तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविण्याची प्रथा असल्यामुळे खाद्यतेलाला फार मोठी मागणी आहे. त्याशिवाय काही तेलांचा आपल्या आरोग्यासाठी तसेच मसाज करण्यासाठी वापर केला जातो. तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे, आपल्या देशात ऑइल मिलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ज्या ठिकाणी भुईमुंगाचे उत्पादन अधिक आहे अशा ठिकाणी तेलाच्या गिरण्या पाहायला मिळतील. 

तेल व्यवसाय ही आपल्या देशातील एक अतिशय यशस्वी व्यवसाय कल्पना आहे, म्हणून आपण इच्छित असल्यास, तेल विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. ऑइल मिल हा एक उत्तम व अखंड चालणारा व्यवसाय आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याची सखोल माहिती किंवा प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला व्यवसायाचे योग्य मार्गदर्शन मिळते.    

खाद्यतेलाचे प्रकार खालील प्रमाणे :-

मोहरीचे तेल, ऑलिव्ह तेल, पाम तेल, सोयाबीन तेल, कॅनोला तेल, भोपळ्याचे तेल, कॉर्न तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, तिळाचे तेल, तांदूळ तेल इ. याशिवाय इतर अनेक वनस्पती तेलांचा वापर स्वयंपाकात केला जातो. त्यामुळे आपल्याला कोणत्या ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे, ते ठरवा आणि त्याप्रमाणे पाऊले उचला.

 ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी –
ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे, त्या नंतर तुम्ही यशस्वीरीत्या  हा व्यवसाय सुरू करू शकता.      

भांडवल :-   

ऑइल मिलचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे रु.५०,००० ते रु.२.५ लाख एवढे भांडवल अत्यावश्यक आहे.

परवाना आणि नोंदणी :-

छोट्या प्रमाणावर ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते परवाने व नोंदणी यांची पूर्तता करणे गरजेचे आहे. याकरीता तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडून उद्योग आधार परवाना आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हा व्यवसाय खाद्यपदार्थांशी संबंधित असल्यामुळे fssai चा परवाना आणि नोंदणी देखील आवश्यक आहे.

ऑइल मिलसाठी लागणारी जागा :-   
२०० ते ३०० स्के. फू. जागेमध्ये आपण छोटा ऑइल मिलचा व्यवसाय सुरू करू शकता.    

कच्चा माल :- 

मोहरी, तीळ, शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफूल बियाणे, रेपसीड यांसारख्या कच्च्या मालापासून तेलाचे उत्पादन मिळवू शकता.

मशिनरी :-

ऑइल मिलसाथी प्रामुख्याने दोन प्रकारच्या मशिन्सची आवश्यकता आहे.

खाद्यतेल एक्सपेलर
या यंत्रामध्ये कच्च्या बियांमधून तेलाचे उत्पादन काढले जाते. यामध्ये तेल आणि बियांचा लगदा वेगळा होतो. पशुंसाठी खाद्य म्हणून देखील हा लगदा विकता येतो, त्यातून उत्पन्न मिळते.

तेल फिल्टर मशीन
या मशीनच्या मदतीने तेल फिल्टर करून पॅकेजिंगसाठी तयार केले जाते. इलेक्ट्रिक आणि डिझेल अशा दोन प्रकारच्या मशीन्स उपलब्ध आहेत.     

त्याचप्रमाणे वजन करण्यासाठी वजनयंत्र, याची किंमत रु.५,०००/- ते १०,०००/-  व प्लास्टिक पिशवी पॅकिंगकरीता सीलिंग मशीन, याची किंमत रु.२०००/- आहे. किंवा तेल भरण्यासाठी आपण प्लास्टिकच्या बाटल्यांचा देखील वापर करू शकता. 

सुरुवातीला व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रथम स्वत: तेल वापरून पहा. ते जर वापरण्यास योग्य असेल तर तुमच्या जवळच्या शेजारी, मित्रमंडळी व नातेवाईक यांना नमुने द्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया घ्या. जर त्यांच्या प्रतिक्रिया योग्य नसतील तर तुमच्या उत्पादनामध्ये काहीतरी चूक आहे, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे अधिक माहिती घ्या व उत्पादनामध्ये बदल करा. त्यानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रिया उत्तम असतील तर त्याप्रमाणे उत्पादन करण्यास सुरुवात करा. आज बाजारामध्ये तेलाची प्रचंड मागणी आहे, त्यामुळे सुरुवातीला तुमच्या विभागात व्यवसाय करण्यास सुरुवात करा आणि मग हळू हळू व्यवसाय वाढवा. तेलाचा व्यवसाय हा अधिक फायदेशीर आहे. या व्यवसायात १५% ते २०% एवढा नफा मिळवता येतो.           

ऑइल मिल मशीनचे उत्पादक –

1. सुनील इंडस्ट्रीज                                                           
संपर्क व्यक्ती : प्रशांत सुतार
पत्ता : 1325/69, शिवाजी उद्यम नगर, कोटीर्थ जवळ,
चाल – ४१६००८, महाराष्ट्र, भारत.
दूरध्वनी क्र. :  + 91 – 93711 26464, + 91 – 93712 26464,
+९१ – ९३७३० ८२३७६, +९१ – ८८८८४ ४४१०२
+91-231-2656576, +९१ -२०-२४३७६२४४
ईमेल: response@oilmillmachinesindia.com
वेबसाइट: www.oilmillmachinesindia.com

2. मॅक्लॉर्ड ग्लोबल इंडस्ट्रीज (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड
श्री सहदेव करंजीकर (संचालक)
गेट क्रमांक १५२९, सोनवणे वस्ती चिखली, महालक्ष्मी वजन पुला लेन, पुणे – ४१११०६२,
दूरध्वनी क्र. : ०८०३७४००१५९
वेबसाइट – www.maxlordind.com

3.  मॉर्डन ऑलेक्स वर्क्स
संपर्क व्यक्ती : श्री कार्तिकराव 
पत्ता : W-54, MIDC, गोकिल शिरगाव, ता.कागल, 416202
दूरध्वनी क्र. : 9327229762

4. ओम ऍग्रो ऑरगॅनिक्स
संपर्क व्यक्ती : श्री. विनय दुधे
पत्ता : कृषी मित्र निवास, पेशवे प्लॉट, यवतमाळ-४४५००१
दूरध्वनी क्र. : 942292444

5.  पोटेंशिअल इंजीनीरिंग
संपर्क व्यक्ती : श्री. पियुष सेठ
पत्ता : D-5, सिद्धपुरा इंडस्ट्रियल इस्टेट, अमृत नगर, L.B.S. मार्ग, घाटकोपर (प), मुंबई-400086
दूरध्वनी क्र. : ०२२ – २५००७११५ / २५००८९२९

6.  एसएमबी इंजिनियर्स प्रा. लि.
पत्ता :-४०१, तिसरा मजला, ग्रीन पार्क, चर्च रोड, मरोळ, अंधेरी (पू), मुंबई – ४००५९
दूरध्वनी क्र. : ०२२ – २९२५६७८६ / २९२५७८५२ / २९२५४५५२

7.  बाबा इंजिनीअरिंग वर्क्स
संपर्क व्यक्ती : श्री. अकबर शेख
पत्ता : प्लॉट नँ., 166 एम.आय.डी.सी. फेज-४, लोकमत प्रेस मागे, शिव ऑइल मिलच्या, अकोला – ४४४१०४
दूरध्वनी क्र. : 9823187650

 

मी उद्योजक होणार 

टॉप ५ व्यावसायिक ईबूक बंडल

१. व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा 

२. ईमेल मार्केटिंग 

३. व्हॉट्सअप मार्केटिंग

४. यूट्यूब मार्केटिंग 

५. सुकामेवाचा व्यवसाय कसा करावा 

This Post Has 3 Comments

  1. Supriya Mungekar

    Excellent.

  2. Sachin Bhogle

    खूप छान माहिती मिळाली सर,मला सुरूच करायचा होता हा व्यवसाय.
    धन्यवाद.
    🙏🙏🙏

  3. Jaydeep

    खूप छान माहिती.

Comments are closed.