Sale!

New Look – Business eBook Bundle

99.00

व्यावसायिक ईबुक्स बंडल 

१. व्यवसायासाठी भांडवल कसे उभारावे ?

२. सुकामेवाचा व्यवसाय कसा करावा ?

३. व्हॉट्सआप मार्केटिंग 

४. ईमेल मार्केटिंग 

५. युट्यूब मार्केटिंग   

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

        मी हे ईबूक्स माझ्या नऊ वर्षांच्या अनुभवातून आणि आलेल्या प्रसंगातून लिहिलं आहे. मला लिखाणाची फार आवड होती. मी लहान मुलांना छोटी छोटी नाटके, एकांकिका लिहून देत होतो आणि त्यांच्या नाटकांना मीच दिग्दर्शन करत होतो. ती लहान मुले त्यांच्या शाळेत हे नाटक किंवा एकांकिका सादर करत, आणि छान झाल्याच मला सांगत. आपलं लिखाण चांगलं आहे याचं मला अभिमान वाटे. मी कथा लिहित असे. चित्रपटांच्या कथा लिहित असे. एकदा माझ्या आजोबांनी सांगितलेली “चतुर धोंडया” ही गोष्ट “सामना” या वृत्तपत्रात छापून आली होती. घरात, आजूबाजूला व मित्रांमध्ये माझं कौतुक झाल. मी “उपाशी वऱ्हाडी” हे मराठी नाटक १९९५ मध्ये लिहिलं होतं. या नाटकाचे दोन प्रयोग डिसेंबर १९९६ आणि जानेवारी १९९७ रोजी अनुक्रमे शिवाजी मंदिर व दामोदर हॉल या नाटयगृहात सादर केले. या नाटकात दोन तीन कलाकार सोडले तर बाकी सगळे आमच्याच घरचे होते. या नाटकात प्रमुख भूमिका करणाऱ्या हिरोची आई सापडत नव्हती. माझ्या मित्रांनी माझ्या पत्नीला आईचा रोल करण्याची विनंती केली. माझी पत्नी त्यावेळी गरोदर असताना देखील ही जबाबदारी तिने आनंदाने स्विकारली. तिने सादर केलेल्या कलेला माझ्याकडे शब्दच नव्हते. लोकांचा या नाटकाला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. माझ्या लिखाणाला नेहमीच लोकांनी दाद दिली आहे.

          बऱ्याच नवीन व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची फार मोठी ईच्छा असते. पण भांडवल नसल्यामुळे त्यांचे स्वप्न अर्धवट राहते. व्यवसाय करण्यासाठी भांडवल कसे उभारावे याचा सविस्तर वृतान्त या पुस्तकात मांडला आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय सुरू केल्यानंतर तो कसा वाढवता येईल याकरिता इतर ईबूक्स लिहिले आहेत. त्यामुळे नवीन व्यावसायिकांना हे मार्गदर्शन फार मोलाचे ठरेल. माझे हे पुस्तक आपल्याला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझ्या पुस्तकाला रेटिंग द्या.   

धन्यवाद !

रविंद्र वि. नागांवकर

लेखक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “New Look – Business eBook Bundle”