व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा ?
₹198.00
टॉप ५ व्यावसायिक ईबूक्स
कित्येक हुशार, होतकरू, सुशिक्षित व पदवीधर मराठी तरुण बेरोजगार आहेत. नोकरी नसल्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही. अशा तरुणांनी नोकरीच्या मागे न लगता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा आणि नोकरी पेक्षाही अधिक उत्पन्न कमवावे.
नोकरी आज आहे तर उद्या नाही, परंतु व्यवसाय पिढ्यान पिढ्या चालत राहतो. म्हणून मराठी तरुणांनी व्यवसाय सुरू करावा.
व्यवसाय कसा निवडावा, कसा सुरू करावा आणि कसा वाढवावा. तसेच ग्राहक कसे वाढवावेत, उत्पन्न कसे वाढवावे याचे सविस्तर मार्गदर्शन या ईबूकमध्ये दिले आहे.
Description
आपण हे पुस्तक विकत घेतलतं याचाच अर्थ आपल्याला व्यवसाय करण्याची तीव्र ईच्छा आहे, आपल्या मनात व्यवसायच बीज हळूहळू रुजत चालल आहे, हे दिसून येत. या उद्योग जगतात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनोपूर्वक अभिनंदन. व्यवसाय आज म्हटलं की लगेच उद्या सुरू होत नाही. जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रांची व्यवसायात तग धरून राहण्यासाठी आवश्यकता असते. कष्ट घेण्यासाठी मनाची पूर्ण तयारी करावी लागते. तुम्ही व्यवसाय करण्याचा निर्धार केलाच आहे तर मग आता मागे वळून पाहू नका. आपण व्यवसाय करायचच हि जिद्द ठेऊनच रणांगणात उतरा, एकदा रणांगणात उतरलात की डावपेच कसे आखायचे, हे तुम्ही शिकता. ते डावपेच कसे खेळायचे ही परिस्थिती त्यावेळी तुम्हाला शिकवते. एकदाका डावपेच खेळायला शिकलात की, यश आपलच आहे यावर विश्वास ठेवा. एकदा व्यवसायात गुंतलात की नोकरी करायच विसरून जाल कारण व्यवसायात तुमच्या हातात सतत पैसा खेळत राहतो.
मी हे पुस्तक माझ्या अनुभवातून आणि आलेल्या प्रसंगातून कसं पुन्हा लिहिलं याचा आढावा. मला लिखाणाची फार आवड होती. मी लहान मुलांना छोटी छोटी नाटके, एकांकिका लिहून देत होतो आणि त्यांच्या नाटकांना मीच दिग्दर्शन करत होतो. ती लहान मुले त्यांच्या शाळेत हे नाटक किंवा एकांकिका सादर करत, आणि छान झाल्याच मला सांगत. आपलं लिखाण चांगलं आहे याचं मला अभिमान वाटे. मी कथा लिहित असे. चित्रपटांच्या कथा लिहित असे. एकदा माझ्या आजोबांनी सांगितलेली “चतुर धोंडया” ही गोष्ट “सामना” या वृत्तपत्रात छापून आली होती. घरात, आजूबाजूला व मित्रांमध्ये माझं कौतुक झाल. मी “उपाशी वऱ्हाडी” हे मराठी नाटक १९९५ मध्ये लिहिलं होतं. या नाटकाचे दोन प्रयोग डिसेंबर १९९६ आणि जानेवारी १९९७ रोजी अनुक्रमे शिवाजी मंदिर व दामोदर हॉल या नाटयगृहात सादर केले. या नाटकात दोन तीन कलाकार सोडले तर सगळे आमच्याच घरचे होते. या नाटकात प्रमुख भूमिका करणाऱ्या हिरोची आई सापडत नव्हती. माझ्या मित्रांनी माझ्या पत्नीला आईचा रोल करण्याची विनंती केली. माझी पत्नी त्यावेळी गरोदर असताना देखील ही जबाबदारी तिने आनंदाने स्विकारली. तिने सादर केलेल्या कलेला माझ्याकडे शब्दच नव्हते. लोकांचा या नाटकाला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. माझ्या लिखाणाला नेहमीच लोकांनी दाद दिली आहे. मग टीव्ही वाहिन्यांमधून मी अॅक्टिंग करायच ठरवलं. एका ठिकाणी रु.३५००/- देऊन फोटोशेषन करून घेतलं. एका रोलसाठी ते शेकडो कलाकारांना बोलावत होते. इथे काही आपला निभाव लागणार नाही, हे पाहून मी ते सोडून दिलं. त्यानंतर मी व्यवसाय करण्याच ठरवलं. पण व्यवसाय कोणता करायच हे काही कळत नव्हतं. विचार करता करता वेळ निघून जात होता त्याचबरोबर पैसाही निघून जात होता. व्यवसायचं काही जमत नाही हे पाहून मी शेवटी नोकरीच्या शोधात लागलो. नोकरी मिळाल्यामुळे माझं लिखाण सुटलं पण व्यवसाय करण्याच वेड डोक्यात होत. मिळेल तिथे काम करत होतो कारण कायमची नोकरी नव्हती. एक दिवस काम करायचं, नाही आवडलं की सोडून द्यायचं. कुठे एक दिवस, कुठे सात दिवस तर कुठे महिनाभर काम करायचं आणि सोडून द्यायचं. मी जवळजवळ शेकडोहून अधिक कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या असतील आणि कित्येक कंपन्या सोडल्या असतील. मला कुठेच चांगली नोकरी मिळाली नाही. वडिल सरकारी खात्यात माझ्यासाठी नोकरी शोधत होते ज्यामुळे मला कायमची नोकरी मिळेल आणि माझा सुखाचा प्रवास सुरू होईल असं त्यांना वाटत होतं. मला सरकारी नोकरी मिळावी म्हणून त्यांनी कित्येकांना पैसेही दिले होते. नोकरी तर मिळाली नाही वर पैसेही बुडाले.
मजल दर मजल करत शेवटी जानेवारी २००७ साली मला वडिलांच्या ओळखीने वॉकहार्ट या रुग्णालयात क्लार्कची नोकरी मिळाली. तिथे ऑगस्ट पर्यंत काम केलं आणि तीही नोकरी मी सोडून दिली. मग २४ ऑगस्ट, २००७ रोजी हिरानंदानी रुग्णालयात रु.६,०००/- च्या वेतनावर मला क्लार्कची नोकरी मिळाली. तिथे मी दहा वर्षे नोकरी केली. पण व्यवसाय करण्याच वेड काही मनातून जात नव्हत. शेवटी जून २०१२ रोजी मी व्यवसायाला सुरुवात केली. “नागांवकर ड्रायफ्रुट्स” म्हणून मी व्यवसायाची सुरुवात केली. व्यवसाय व्यवस्थित चालू होता. पण म्हणतात ना सरळ चालेल तो व्यवसाय कसला. व्यवसायात खाचखगळे तर असतात. एक दिवस घरगुती पदार्थ बनविणारा व्यापारी माझ्या दुकानात आला. तुम्ही आमचे घरी बनवलेले वेगवेगळ्या प्रकारची पीठे, लोणची व पापड हे पदार्थ तुमच्या दुकानात ठेवा म्हणजे तुमचं दुकान आणखी व्यवस्तीत चालेल. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांचे पदार्थ दुकानात ठेऊ लागलो आणि विकू लागलो. सुरुवातीला चांगले पदार्थ येत होते. मग नवीन बरोबर जुने पदार्थही येऊ लागले. आम्ही त्यांना याविषयी कळविले. तर ते म्हणाले चालतं हो कोणी लक्ष देत नाही. पण मला हे पटत नव्हतं. खरंतर माझं दुकान असताना मी माझ्या वस्तू विकायच्या सोडून त्यांच्याच वस्तु विकत होतो आणि त्यांनाच नफा मिळवून देत होतो. मी त्यांना सांगितलं, “मला तुमचे पदार्थ विकायचे नाहीत”. तेव्हा त्यांनी जुन्या आणि नवीन पदार्थांचे सरसकट बीले दिली आणि तुम्हाला हे द्यावेच लागतील असे सांगितलं. नको ती कटकट म्हणून मी त्यांचे सर्व पैसे देऊन टाकले. आणि मला हायस वाटलं. मित्रांनो तुम्ही तुमच्या व्यवसायात लक्ष ठेवा. कोणालाही आपल्या व्यवसायत ढवलाढवळ करून देऊ नका.
मार्च २०१५ रोजी माझ्या घरच दुरुस्तीच काम निघालं. सुरुवातीला रु.९०,०००/- चा खर्च होता पण तो वाढत वाढत रु.३,७५,०००/- वर जाऊन पोहोचला. कारण हळू हळू घरच सगळंच काम वाढत गेल. ईतर ठेव, नित्य बचतीचे पैसे वापरले, दागिने मोडले, बँकेकडून कर्ज घेतलं आणि महत्वाचं म्हणजे व्यवसायातील सगळा रोलिंगचा पैसा मी घर खर्चासाठी वापरला. घर तर बनवल पण व्यवसायाची वाईट अवस्था झाली. कारण रोलींगसाठी पैसाच उरला नाही. फार बिकट अवस्था झाली. तरीही मी व्यवसाय सोडला नाही. एकेक दिवस कठीण अवस्थेत जात होता. दुकानाच भाडं थकू लागलं. मालकाने एक दिवस दुकान रिकाम करण्यास सांगितलं. अनामत रकमेतून भाडं कापून माझ्या हातात केवळ रु.१२,०००/- ठेवले. ते दुकान रिकाम करून आम्ही दुसऱ्या दुकानात शिफ्ट झालो. तिथे भाडं आणि अनामत रक्कम कमी होती. मला थोडासा आधार मिळाला. त्या दुकानाचा मालक चांगला नसल्याच मला शेजाऱ्यांनी सांगितलं. आता इथे आलोच आहोत, जे होईल ते जाईल म्हणत मी कामाला सुरुवात केली. लोकांनी सांगितल्या प्रमाणे तो मालक मधे मधे माझ्याकडे पैसे मागत असे. त्याला पैसे दिल्यामुळे पुनः मला व्यवसायात अडचण निर्माण होत होती. वर्ष संपल्यानंतर त्याने भाडं दुप्पट वाढवल. नाईलाजाने मी ते द्यायचं कबूल केल कारण व्यवसाय माझी आवड होती. दुसरं वर्ष संपल्यानंतर पुनः त्यांनी दुप्पट भाडं मागितलं. मी ते देण्यास नाकारल, तसं त्यानी दुकान रिकाम करायला सांगितलं. मी आणि माझी पत्नी आम्ही खूप मेहनत घेत होतो. आमचं वागणं बोलणं खूप चांगलं होतं. ग्राहकांशी आम्ही फार विनम्रपणे बोलत होतो. त्यामुळे ग्राहक आमच्या दुकानातून खूप खरेदी करायचे. हे मालक पहात होते. त्यांना असं वाटायच की, यांच्याकडे खूप पैसे येत आहेत. तेव्हा ते भाडं दुप्पट करायचे. मे २०१९ रोजी, मी दुकान रिकाम केलं. दुकान सोडल्यानंतर मी ठरवलं, आता कोणतही दुकान भाडयाने घ्यायच नाही तर ऑनलाइन व्यवसाय सुरू करायच. आणि मग मी ऑनलाइन व्यवसाय पुन्हा घरातून सुरू केला. मला दुकान सोडव लागल कारण माझ्याकडे असलेले संपूर्ण पैसे मी घरासाठी वापरले, हीच माझी मोठी चूक झाली. शेवटी जे झालं ते चांगलच झालं, मी माझ्या लिखाणाकडे वळलो. पण आपण ही चूक करू नका.
ऑगस्ट २०१९ रोजी मी डिजिटल ट्रेनी या संस्थेमध्ये डिजिटल मार्केटिंगचा कोर्स सुरू केला, ज्यामुळे माझा व्यवसाय आणखी वाढण्यास मदत होईल, अशी मला खात्री होती. कोर्समध्ये मला डिझाईन व वेब डिझाईन कशी करायची हे शिकायला मिळालं. मग मी www.nagaonkarfoods.com ही माझी स्वत:ची वेबसाइट बनवली. या ड्रायफ्रुट्स व्यवसायबरोबर आणखी कोणतातरी व्यवसाय सुरू करावं, असं मला वाटत होतं. पाच सहा महीने विचार केल्यानंतर ads classified website बनवावी, ज्यामुळे आपल्या व्यवसायप्रमाणेच इतर लोकांच्या व्यवसायांनाही त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्यास मदत होईल. हा विचार मनात आल्यानंतर मी www.adonads.net ही दुसरी ads classified website बनवली. वेबसाइट डिझाईन करता करता मला एक कल्पना सुचली. लिखणाची आवड तर मला आहेच, व्यवसाय विषयक पुस्तक लिहावं असं मला नेहमीच वाटत होतं. पण योग येत नव्हता. वेबसाइटमूळे तो योग जुळून आला. तब्बल पंचवीस वर्षांनंतर मी पुन्हा लिहिण्यास सुरुवात केली. “व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा” हे मराठी e-Book लिहिलं. भावी व्यवसायिकांना कोणता व्यवसाय करावा, कसा सुरू करावा आणि तो कसा वाढवावा, हे माहीत नसतं. या पुस्तकात मी माझा संपूर्ण अनुभव लिहिलेला आहे जो नवोदित व्यवसायिकांना फार मार्गदर्शक ठरेल. हे पुस्तक लिहिण्यासाठी परमेश्वराने पंचवीस वर्षांचा एवढा मोठा प्रवास माझ्याकडून करून घेतला. शेवटी मी आवड असलेल्या लिखाणाकडेच वळलो. माझं हे पुस्तक नवोदित व्यवसायिकांना फार उपयुक्त ठरेल, अशी माझी पूर्ण खात्री आहे.
“देऊळ बंद” एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात राघव शास्त्री हे मूळचे भारतीय पण ते अमेरिकेत कायमचे रहिवाशी व शास्त्रज्ञ असतात. त्यांचा देवावर विश्वास नसतो. ते नास्तिक असतात. ज्यांच्यामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो त्या स्वामी समर्थांचा ते राग करतात. जो शत्रू भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असेल त्याची माहिती फ्रिक्वेन्सीद्वारे एक तासाआधी भारताला मिळेल. या प्रोजेकटसाठी ते भारतात आलेले असतात. ते एक आठवाद्याचं काम केवळ पाच दिवसांत पूर्ण करतात. पण ते ज्या लॅपटॉपमध्ये प्रोजेक्ट तयार करतात त्याचा पासवर्ड ते टाकायला विसरतात आणि त्यांची मुलगी चुकीचा पासवर्ड टाकून तो प्रोजेक्ट लॉक करते. हा पासवर्ड मिळविण्यासाठी स्वामी समर्थ त्यांच्याकडून भला मोठा प्रवास करून घेतात आणि त्यांना पासवर्ड शोधण्यासाठी पदोपदी मदत देखील करतात. राघव शास्त्री यांना पासवर्ड मिळतो आणि त्यांचा प्रोजेक्ट ओपन होतो. शेवटी ते स्वामी समर्थांच्या चरणी लीन होतात आणि त्यांची माफी मागतात. या कथे प्रमाणेच ईश्वराने माझ्याकडूनही हे पुस्तक लिहिण्यासाठी पंचवीस वर्षांचा एवढा मोठा प्रवास करून घेतला. देवाने माझ्याकडून अपार कष्ट, मेहनत आणि प्रसंगही तेवढेच दिले खरे, पण पदोपदी मला मदत देखील तेवढीच केली.
हे पुस्तक वाचल्यानंतर नवोदित व्यवसायिकांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, यात काही शंका नाही. मी प्रत्येक बाब अगदी व्यवस्थित मांडलेली आहे. काय करावं आणि काय करू नये, हे माझे अनुभव नवोदित व्यवसायिकांना फार उपयुक्त ठरतील. माझी नवोदित व्यवसायिकांना विनंती आहे, व्यवसाय करायचं ठरवलं आहे, मग बिनधास्त करा, आणि यशस्वी व्हा.
माझे हे पुस्तक आपल्याला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझ्या पुस्तकाला रेटिंग द्या.
धन्यवाद !
रविंद्र वि. नागांवकर
लेखक
29 reviews for व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा ?
You must be logged in to post a review.
Umesh Kapure –
Very nice thought for readers
Vedant Date –
Very useful ebooks for business owners.
Ramesh Tambe –
Very good.
Vijay Kelaskar –
very good
Subodh Rodge –
Nice eBook.
Ajay Salve –
सरासरी नफ्याचे गणित छान मांडले आहे.
Mahendra Musale –
Very good.
Sanjay Nephade –
कित्येक व्यववसायिक आयकर भरात नाहीत, कारण त्यांना त्याचे महत्व माहीत नाही. तुम्ही ते महत्व पटवून दिले आहे.
Rajendra Shirsat –
भुलथापांपासून कसे सुरक्षित राहावे, हे फार महत्वाचे आहे आणि तुम्ही ते छान लिहिले आहे.
Chandrakant Ghadekar –
marathimadhye chan lihile ahe
Mangesh Dongre –
Very Good.
Deepak Devlekar –
छान लिहिले आहे.
Sanmir Devrukhkar –
स्वतचे दुकान कसे घ्यावे, हे खूपच छान लिहिले आहे.
Sharad Bandekar –
Very good
Ankush Gawade –
ग्राहक कसे वाढवावेत, याच्या चांगल्या टिप्स दिल्या आहेत.
Ranjit Thore –
very good
Umesh Lanjekar –
nice ebook
Baban Shingare –
very good.
Navneet Apte –
nice ebook.
Mahesh Tamboli –
व्यवसाय वाढविण्यासाठी पैसे कसे जमा करावेत, हे गणित उत्तम आहे.
Dharmesh Patange –
very good
Surendra Patil –
स्वागत आहे सर आपले. खुप कठीण प्रसंगातून सामोरे गेले आहे सर आपण. मी वाचले तुमचे व्यवसाय बद्दल. खुप खुप आभारी आहों सर.आपले. तुमचा लेखन वाचून त्या दिवसापासून माझा आत्मविश्र्वास खुप वाढला आहे.
Ashok Misal –
खूपच छान आपले eBook.
Chetan Devre –
मला तर खुप आवडली ईबूक्स. मी तुम्हाला माझा गुरु मानतो.
Khushal Manore –
नमस्कार सर,
eBook Bundle विकत घेतले आहे आणि सुका मेव्याचा व्यवसाय घरून करू इच्छितो आहे.
Anil Chavan –
तुमचे ebook वाचणं चालू आहे पहिल्या पासूनच सुरवात खूप चांगली आहे . ज्याला नोकरी करायची आहे तो सुधा ebook वाचून व्यवसायात नक्की उतरेल व यशस्वी होईल . असेच सहकार्य करत रहा. तुमचा मनापासून आभारी आहे.
Rajendra Sonkamble –
या ईबूकमध्ये उत्पन्न कसे वाढवावे, याचे गणित खूप चयन दिले आहे.
Thank you sir.
जगन्नाथ पाटील –
धोके कसे ओळखावे हे फार महत्वाचे सांगितले आहे . खूप छान.
Yogesh Parab –
मराठी माणसाने व्यवसाय कसे करावे आणि त्याचे नियोजन कसे करावे, हे मला या ईबूक मधून समजले.