Email Marketing
₹40.00
ईमेल मार्केटिंग
१. ईमेल मार्केटिंग व महत्व
२. ईमेल मार्केटिंगचे फायदे
३. ईमेल सॉफ्टवेअर्स
४. इमेल्स कसे मिळवावे?
५. इमेल्सचे प्रकार
६. लीड मॅग्नेट म्हणजे काय
७. इमेल्स पाठविण्याआधी महत्वाचे मुद्दे
८. इमेल्स टेंपलेट्स कसे तयार करावेत ?
९. ईमेल कसा लिहावा ?
१०. इमेल्सचा विषय कसा असावा ?
Description
आपण हे पुस्तक विकत घेतलतं याचाच अर्थ आपल्याला व्यवसाय करण्याची तीव्र ईच्छा आहे, आपल्या मनात व्यवसायच बीज हळूहळू रुजत चालल आहे, हे दिसून येत. या उद्योग जगतात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनोपूर्वक अभिनंदन. व्यवसाय आज म्हटलं की लगेच उद्या सुरू होत नाही. जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रांची व्यवसायात तग धरून राहण्यासाठी आवश्यकता असते. कष्ट घेण्यासाठी मनाची पूर्ण तयारी करावी लागते. तुम्ही व्यवसाय करण्याचा निर्धार केलाच आहे तर मग आता मागे वळून पाहू नका. आपण व्यवसाय करायचच हि जिद्द ठेऊनच रणांगणात उतरा, एकदा रणांगणात उतरलात की डावपेच कसे आखायचे, हे तुम्ही शिकता. ते डावपेच कसे खेळायचे ही परिस्थिती त्यावेळी तुम्हाला शिकवते. एकदाका डावपेच खेळायला शिकलात की, यश आपलच आहे यावर विश्वास ठेवा. एकदा व्यवसायात गुंतलात की नोकरी करायच विसरून जाल कारण व्यवसायात आपल्या हातात सतत पैसा खेळत राहतो.
मी हे पुस्तक माझ्या नऊ वर्षांच्या अनुभवातून आणि आलेल्या प्रसंगातून लिहिलं आहे. मला लिखाणाची फार आवड होती. मी लहान मुलांना छोटी छोटी नाटके, एकांकिका लिहून देत होतो आणि त्यांच्या नाटकांना मीच दिग्दर्शन करत होतो. ती लहान मुले त्यांच्या शाळेत हे नाटक किंवा एकांकिका सादर करत, आणि छान झाल्याच मला सांगत. आपलं लिखाण चांगलं आहे याचं मला अभिमान वाटे. मी कथा लिहित असे. चित्रपटांच्या कथा लिहित असे. एकदा माझ्या आजोबांनी सांगितलेली “चतुर धोंडया” ही गोष्ट “सामना” या वृत्तपत्रात छापून आली होती. घरात, आजूबाजूला व मित्रांमध्ये माझं कौतुक झाल. मी “उपाशी वऱ्हाडी” हे मराठी नाटक १९९५ मध्ये लिहिलं होतं. या नाटकाचे दोन प्रयोग डिसेंबर १९९६ आणि जानेवारी १९९७ रोजी अनुक्रमे शिवाजी मंदिर व दामोदर हॉल या नाटयगृहात सादर केले. या नाटकात दोन तीन कलाकार सोडले तर बाकी सगळे आमच्याच घरचे होते. या नाटकात प्रमुख भूमिका करणाऱ्या हिरोची आई सापडत नव्हती. माझ्या मित्रांनी माझ्या पत्नीला आईचा रोल करण्याची विनंती केली. माझी पत्नी त्यावेळी गरोदर असताना देखील ही जबाबदारी तिने आनंदाने स्विकारली. तिने सादर केलेल्या कलेला माझ्याकडे शब्दच नव्हते. लोकांचा या नाटकाला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. माझ्या लिखाणाला नेहमीच लोकांनी दाद दिली आहे.
बऱ्याच नवीन व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची फार मोठी ईच्छा असते. पण व्यवसाय कसा वाढवावा याची माहिती त्यांना नसते. ईमेल मार्केटिंगच्या माध्यमातून व्यवसाय आणखी कसा वाढवावा याचा सविस्तर वृतान्त या पुस्तकात मांडला आहे. त्यामुळे नवीन व्यावसायिकांना हे मार्गदर्शन फार मोलाचे ठरेल. माझे हे पुस्तक आपल्याला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझ्या पुस्तकाला रेटिंग द्या.
धन्यवाद !
रविंद्र वि. नागांवकर
लेखक
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.