You are currently viewing मसाला बनविण्याचा व्यवसाय सुरू करा आणि महिना रु.५०,००० कमवा 2023

मसाला बनविण्याचा व्यवसाय सुरू करा आणि महिना रु.५०,००० कमवा 2023

भारतीय अन्न हे बर्‍याच देशांमध्ये सर्वात लोकप्रिय पाककृतींपैकी एक आहे. मसाल्याचे वेगवेगळे घटक अन्न पदार्थाची रुची वाढविण्यास मोलाची कामगिरी बजावतात. त्यामुळे अन्न पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते. मसाला भारतातील एक महत्त्वाचा उद्योग आहे. आपला देश आले, हळद, मिरची आणि जिरे यासह अनेक मसाल्यांचा उत्पादक आहे. आपल्या भारत देशात मसाल्यांच्या ५० पेक्षा अधिक जाती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवण्यात भारत देश अग्रेसर आहे. त्यामुळे मसाला बनविण्याचा व्यवसाय सुरू करा आणि महिना रु.५०,००० कमवा कारण पुढे मसाल्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि हा वापर तुम्हाला मसाल्यांच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देणार आहे. तथापि, हा उत्पादन व्यवसाय मध्यम आकारात चालू करून चांगला नफा मिळवू शकता. मसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी काही आवश्यक घटकांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

आपल्या भारत देशामध्ये मसाल्याचे वेगवेगळे पन्नास प्रकार तयार केले जातात. प्रत्येक राज्यामध्ये मसाल्याचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. गरम मसाला, पाव भाजी मसाला, बीरीयनी मसाला, इडली-वडा सांभार मसाला, पुलाव मासला, पनीर मासला, मच्छी कडी मसाला, चिकन मसाला, मॅगी मसाला, चहाचा मसाला, भेंडी मसाला, लोणचे मसाला  महाराष्ट्रातील प्रसिद्ध मालवणी मसाला, आगरी मसाला, गरम मसाला असे व अनेक मसाल्याचे प्रकार आहेत. 

मसाला बनविण्याचा व्यवसाय सुरू करा

आणि महिना रु.५०,००० कमवा

बाजाराचे सर्वेक्षण करा (Market Survey):-

ज्या वस्तूचा आपल्याला व्यवसाय करायचा आहे व त्या व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे, त्यासाठी तुम्हाला बाजाराचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. बाजाराचे सर्वेक्षण केल्यानंतरच कोणत्या वस्तूला अधिक मागणी आहे, त्याचे ग्राहक कोण आहेत, मालाचा खप किती आहे, घाऊक व रीटेल बाजारात त्याची किंमत किती आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. जी तुमच्या व्यवयायासाठी फार उपयुक्त असेल.

मसाले उद्योगासाठी आवश्यक मशीनरी (Masala Manufacturing Machine):-

मसाल्याची उत्तम गुणवत्ता येण्यासाठी व ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही मशीनरी विकत घ्यावी लागेल.

क्लीनर मसाला मशीन

ड्रायर मसाला मशीन

ग्राइंडर मसाला मशीन

पॉवर ग्रेडर मसाला मशीन

पॅकिंग मशीन

मसाले उद्योग नोंदणी ( Business Registration):-

मसाला उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला शासकीय परवन्यांची पूर्तता करावी लागेल. त्यानंतर तुमचा व्यवसाय सरकारच्या नियमाप्रमाणे सुरू करू शकता.

उद्योग आधार

Fssai परवाना

बीआयएस प्रमाणपत्र

एमएमएसई व एमएलएस नोंदणी

Gst नोंदणी

प्रदूषण परवाना

मसाला बनविण्याचा व्यवसाय सुरू करा

आणि महिना रु.५०,००० कमवा

व्यवसायासाठी जागा (Business Place):-

तुम्ही मसाला उद्योग घरातून देखील सुरू करू शकता. १५० ते २०० स्के.फु. जागेमध्ये मसाला उद्योग सुरू करू शकता. व्यवासायाची जागा ओलसर नसेल याची खात्री करा.

मसाले व्यवसायासाठी खर्च ( Finance for Business):-

मसाला व्यवसाय उभारण्यासाठी तुम्हाला अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही.    कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करू शकता. प्रारंभीक म्हणजे मशीन व कच्चा माल विकत घेण्यासाठी तुम्हाला सुमारे  ६०,०००/- ते ७०,०००/- रुपये खर्च अपेक्षित आहे.

विपणन (Masala Marketing):-

तुम्ही व्यवसायाचे मार्केटिंग अनेक पद्धतीने करू शकता. आपल्या व्यवसायाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचावी म्हणून तुम्ही सोशल मिडिया मार्केटिंग करू शकता. तुम्ही थेट दुकानदारांशी संपर्क साधून तुमच्या उत्पादनाची विक्री करू शकता. जर तुमचे उत्पादन अधिक आहे तर तुम्ही घाऊक व्यापाऱ्यांनाही विक्री करू शकता.

नफा (Net Profit):-

उत्तम गुणवत्ता व योग्य मार्केटिंग केलात तर तुम्ही दर महिन्याला ५०,०००/- रू. पेक्षाही अधिक उत्पन्न मिळवू शकता. म्हणून मसाला बनविण्याचा व्यवसाय सुरू करा आणि महिना रु.५०,००० कमवा. 

मसाला मशीन उत्पादक (Masala Machine Manufacturers List):-

१. कैलास इंजीनीरिंग वर्क्स

संपर्क व्यक्ती : श्री कैलास चोपडे

पत्ता : सेक्टर क्रमांक 7, प्लॉट क्रमांक 206, PCNTDA, MIDC भोसरी, पुणे – 411026

दूरध्वनी क्र. : ९४२३१६२१९६ / ९८२२३४९९८३

वेबसाइट्स : www.foodprocessingequipments.net

 

२. त्रिशा इंडस्ट्रीयल प्रोडक्टस

संपर्क व्यक्ती : श्री. योगेश यादव

पत्ता : फ्लॅट नं.- 103,1ला मजला,सागर आपटे स्‍भा,पालघर गोराई नाका,समोर. झोया हॉस्पिटल, नालासोपारा पूर्व, वसई, ठाणे – 401209

दूरध्वनी क्र. : 7709863018 / 077588 59829

ईमेल : Trishaindustrialproduct522@gmail.com

वेबसाइट : https://trishaindustrialproducts.com/

३. ओम साई इंजिनिअरिंग

संपर्क व्यक्ती : आनंद गायकवाड (मालक)

पत्ता : पुणे-नाशिक महामार्ग, मेदनकनवाडी जवळ, चाकण, पुणे-410501, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्र. : ९३७०२ ९३६३९

ईमेल : omsaiengineering42@gmail.com

४. शिवराज ऍग्रो इंडस्ट्रीज

पत्ता : S. No. 45/3/3, निंबाळकरवस्ती, गुजरवाडी आरडी, कात्रज, पुणे, महाराष्ट्र 411046

दूरध्वनी क्र. : ०९९२२७ ४८२१९

५. सनराइज किचन ईक्विपमेंट

पत्ता : प्लॉट नं.५३०/३२ विजय नगर, गोकुळ शिरगाव, एमआयडीसी करवीर, कोल्हापूर – ४१६२३४

दूरध्वनी क्र. : ९६३७४२७१५७

६. सनराइज मशीनरी

पत्ता: प्लॉट नं, साई-दीप, १५-ए, एअरपोर्ट आरडी, शिव पार्वती नगर, उजळाईवाडी, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६००४

दूरध्वनी क्र. : ०९७३०४ ३३७७७

Start a spice making business And

earn Rs.50,000 per month

७. विश्वकर्मा उद्योग

संपर्क व्यक्ती : श्री.विजय लोहार

पत्ता : प्लॉट नं. ई ८, एमआयडीसी, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर ४१६२३४, महाराष्ट्र (भारत)

दूरध्वनी क्र. : +९१-(२३१) २६७२४३९ / ८९७५१७११११

ईमेल: vishwakarmaudhyog3@rediffmail.com

८. यज्ञम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड

संपर्क व्यक्ती : सुयश कलासकर (व्यवस्थापकीय संचालक)

पत्ता : भूखंड क्रमांक बी-40, टी.टी.सी. औद्योगिक क्षेत्र, MIDC रोड, दिघे M.I.D.C., रिलायबल प्लाझाच्या मागे, रबाळे, नवी मुंबई – 400701, ठाणे, महाराष्ट्र, भारत

दूरध्वनी क्र. : ९८२१६१३१३९

वेबसाइट : www.yognm.com

ईमेल : sales@yognm.com

९. के.आर. इंजीनीरिंग वर्क्स

संपर्क व्यक्ती : अझर शेख

पत्ता : आरएम हाऊस, जामा मस्जिद लेन, खैरानी रोड, जामा मस्जिदच्या पुढे, साकी नाका, मुंबई, महाराष्ट्र 400072

दूरध्वनी क्र. : +९१ ९९३०७२२९५९

ईमेल : krengg76@gmail.com

वेबसाइट : krengineeringworks.in

१०. आनंदा इंजीनीरिंग वर्क्स

पत्ता : दुकान क्रमांक 3, एम-85 जवळ, एमआयडीसी अंबड, नाशिक, महाराष्ट्र – 422 010.

दूरध्वनी क्र. : +९१ ९८२२८३३२९७ / ७६६६४०२०७७

ईमेल : anandengineering83@gmail.com

वेबसाइट : www.anandaengineeringworks.com

११.  साईराम मशीन्स आणि टूल्स

संपर्क व्यक्ती: अभय वसंतराव खंडारकर (संचालक)

पत्ता : इंद्रजी दळवी बंगलोच्या, भारत ४, दळवीवाडी, नांदेड फाटा डीएसके रोड, पुणे – १११११०४१, महाराष्ट्र

दूरध्वनी क्र. : ८६००७७३७४७ / ७७४१९७१३९३

वेबसाइट : https://www.sairammachines

१२. एस डी ट्रेडर्स

संपर्क व्यक्ती:  दत्ता देवकाते (भागीदार)

पत्ता : १/८, रिव्हर रोड, सारस्तो सायकल मार्ट जवळ, पिंपरी, पुणे-411018, महाराष्ट्र, भारत

संपर्क : +९१ ८२०८६४०४१६ / ७७२२०८०७०७

ईमेल : sdtraders07@gmail.com

 

 

Start a spice making business And

earn Rs.50,000 per month

निष्कर्ष  ( Conclusion ) :-

मसाल्याचे वेगवेगळे घटक अन्न पदार्थाची रुची वाढविण्यास मोलाची कामगिरी बजावतात. त्यामुळे मसाला उत्पादन व्यवसायाला बाराही महीने मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्याचप्रमाणे हा व्यवसाय करण्यासाठी मोठ्या जागेची किंवा मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही. हमखास उत्पन्न मिळवून देणारा असा हा व्यवसाय आहे. त्यामुळे मसाला बनविण्याचा व्यवसाय सुरू करा आणि महिना रु.५०,००० कमवा.