मराठी माणूस व्यवसाय का करत नाही ?
मराठी माणूस व्यवसाय न करण्याची बरीच कारणे आहेत. त्याची सुरवात प्रथम घरापासूनच होते – बाळा खूप शिक, खूप मेहनत घे, मोठा हो, पण एक नोकरी धर. व्यवसायाच्या भानगडीत पडू नकोस, आपल्याला व्यवसाय जमणार नाही. आपल्या घराण्यात कोणी व्यवसाय केला नाही. मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही. व्यवसाय करायचा म्हणजे खूप मोठा ताप असतो . व्यवसाय करायचा म्हणजे मोठा खर्च असतो . व्यवसायात कधी पैसा मिळतो तर कधी मिळत नाही, याची खात्री नसते. व्यवसायमध्ये फार मोठा धोका असतो. सतत धावपळ करावी लागते, दुकान नेहमी चालू ठेवावे लागते. आराम मिळत नाही. पैसा अधिक आला की झोप लागत नाही. मग टाटा, बिर्ला, अंबानी हे काय देवाचे दुत आहेत. त्यांना त्रास झाला नाही का ? त्यांना सुद्धा बऱ्याचवेळा अपयश आले असेल, शिकस्त खावी लागली…