मराठी माणूस व्यवसाय का करत नाही ?

मराठी माणूस व्यवसाय न करण्याची बरीच कारणे आहेत. त्याची सुरवात प्रथम घरापासूनच होते – बाळा खूप शिक, खूप मेहनत घे, मोठा हो, पण एक नोकरी धर. व्यवसायाच्या भानगडीत पडू नकोस, आपल्याला व्यवसाय जमणार नाही. आपल्या घराण्यात कोणी व्यवसाय केला नाही. मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही. व्यवसाय करायचा म्हणजे खूप मोठा ताप असतो . व्यवसाय करायचा म्हणजे मोठा खर्च असतो . व्यवसायात कधी पैसा मिळतो तर  कधी मिळत नाही, याची खात्री नसते. व्यवसायमध्ये फार मोठा धोका असतो. सतत धावपळ करावी लागते, दुकान नेहमी चालू ठेवावे लागते. आराम मिळत नाही. पैसा अधिक आला की झोप लागत नाही.       मग टाटा, बिर्ला, अंबानी हे काय देवाचे दुत आहेत. त्यांना त्रास झाला नाही का ? त्यांना सुद्धा बऱ्याचवेळा अपयश आले असेल, शिकस्त खावी लागली…

Comments Off on मराठी माणूस व्यवसाय का करत नाही ?

१०० वर्षे निरोगी आयुष्य कसे जगायचे ?

१०० वर्षे निरोगी आयुष्य कसे जगायचे ? आपण पाहतो की काही व्यक्ति अक्षरशा: वयाची शंभरी पार केलेले असतात. त्यांनी एवढी शंभर वर्षे आपल्या शरीराला कसे सांभाळले? त्यांनी कोणत्या शक्ति वर्धक गोळ्या घेतल्या, निरोगी राहण्यासाठी कोणते च्यवनप्राश घेतले, फिट आणि फाइन राहण्यासाठी कोणत्या पावडरचे सेवन केले. त्यांनी यापैकी काहीच केले नाही. तर ते आतापर्यंत फक्त घरचे ताजे व सकस अन्न खात आले आहेत. ते जसे शंभर वर्षे जगले तसे आपण ही जगू शकतो, कोणत्याही औषधे, पावडर किंवा गोळ्या न खाता. काही गोष्टींच्या नियमांचे पालन करणे फार गरजेचे आहे. तेव्हाच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. सकाळी लवकर उठा पूर्वी लोक सकाळी चार वाजता उठत आणि आपल्या कामाला लागत. आपणही सकाळी लवकर उठले पाहिजे. सकाळी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे. लवकर उठल्यामुळे आपली कामे…

Comments Off on १०० वर्षे निरोगी आयुष्य कसे जगायचे ?

कोणतेही कर्ज न घेता मुलांना उच्च शिक्षण कसे द्यावे ?

         प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या लग्नाचा अधिक विचार  करत असतात. त्यासाठी पै न पै जमा करत असतात. काही वेळेला पैसे कमी पडले तर मुलांच्या शिक्षणसाठी व्याजाने पैसे काढतात. मुलांची लग्न करण्यासाठी कर्ज काढतात. आणि पुन्हा पुढील तीन ते चार वर्षे ते कर्जाचे हफ्ते भरत असतात. खालील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल कि, मुलांचं शिक्षण किंवा लग्नाचे शुभ कार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढण्याची गरज नाही. आपल्याच रकमेतून थोडी थोडी रक्कम जमा करून पंधरा ते वीस वर्षात आपण भली मोठी रक्कम जमा करू शकतो.       आपण इथे पंचवीस वर्षांचा कालावधी गृहीत धरू. कारण हल्ली शिकलेली तरुण पिढी वयाच्या पंचवीस वर्षानंतर लग्न करतात. जर आपला मुलगा किंवा मुलगी १ वर्षाचे असतील तर आपल्या कडे पूर्ण पंचवीस वर्षे…

Comments Off on कोणतेही कर्ज न घेता मुलांना उच्च शिक्षण कसे द्यावे ?