प्रचंड मागणी असलेला तेल उत्पादनाचा व्यवसाय सुरू करा.
खाद्यतेल म्हणजेच Edible oil चा प्रत्येक खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपल्या मूलभूत गरजांप्रमाणेच तेल ही एक अत्यावश्यक गरज बनली आहे. स्वयंपाकघरापासून ते छोट्या मोठया हॉटेल्समध्ये खाद्य तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविण्याची प्रथा असल्यामुळे खाद्यतेलाला फार मोठी मागणी आहे. त्याशिवाय काही तेलांचा आपल्या आरोग्यासाठी तसेच मसाज करण्यासाठी वापर केला जातो. तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे, आपल्या देशात ऑइल मिलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ज्या ठिकाणी भुईमुंगाचे उत्पादन अधिक आहे अशा ठिकाणी तेलाच्या गिरण्या पाहायला मिळतील. तेल व्यवसाय ही आपल्या देशातील एक अतिशय यशस्वी व्यवसाय कल्पना आहे, म्हणून आपण इच्छित असल्यास, तेल विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. ऑइल मिल हा एक उत्तम व अखंड चालणारा व्यवसाय आहे. कोणताही व्यवसाय सुरू…