१०१ व्यावसायिक यंत्र उत्पादक – यशस्वी उद्योजकांसाठी मार्गदर्शक
आपण हे पुस्तक विकत घेतलतं याचाच अर्थ आपल्याला व्यवसाय करण्याची तीव्र ईच्छा आहे, आपल्या मनात व्यवसायच बीज हळूहळू रुजत चालल आहे, हे दिसून येत. या उद्योग जगतात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनोपूर्वक अभिनंदन. व्यवसाय आज म्हटलं की लगेच उद्या सुरू होत नाही. जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रांची व्यवसायात तग धरून राहण्यासाठी आवश्यकता असते. कष्ट घेण्यासाठी मनाची पूर्ण तयारी करावी लागते. तुम्ही व्यवसाय करण्याचा निर्धार केलाच आहे तर मग आता मागे वळून पाहू नका. आपण व्यवसाय करायचच हि जिद्द ठेऊनच रणांगणात उतरा, एकदा रणांगणात उतरलात की डावपेच कसे आखायचे, हे तुम्ही शिकता. ते डावपेच कसे खेळायचे ही परिस्थिती त्यावेळी तुम्हाला शिकवते. एकदाका डावपेच खेळायला शिकलात की, यश आपलेच आहे, यावर विश्वास ठेवा. एकदा व्यवसायात गुंतलात की नोकरी करायचे विसरून जाल…