You are currently viewing नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय?

नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय?

          सगळ्याच व्यवसायाच्या मार्केटिंगप्रमाणे आणखी एक प्रकार म्हणजे म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. सोप्या भाषेत सांगायचे तर, नेटवर्क मार्केटिंग ही एक व्यावसायिक संकल्पना आहे जी स्वतंत्र वितरकांवर अवलंबून असते. ती वितरकांना वस्तु व सेवा यांची थेट विक्री करण्याची परवानगी देते. तुम्ही नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये वितरक म्हणून काम करता तेव्हा तुम्हाला इथे स्वत:च मेहनत करावी लागते. हा तुमचा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. इतर सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या समवेत काम करण्याची परवानगी देते. तुम्हाला भागीदार किंवा विक्रेत्यांचे नेटवर्क विकसित करावे लागते. नेटवर्क मार्केटिंग कंपनी ही वितरकांच्या नेटवर्कवर अवलंबून राहून वस्तु व सेवा यांची अधिक विक्री वाढवते.
मार्केटिंग, या शब्दातच अनेक प्रतिमा दडलेल्या आहेत. जेव्हा हा शब्द ऐकतो तेव्हा आपण दुकाने, उद्योग, व्यवसाय याबाबतीत विचार करतो. मार्केटिंग हे छोटे व्यवसाय ते मोठ्या व्यवसायांपर्यंत सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना याची गरज पडते. जगात बदल होत चाललेल्या इतर सर्व गोष्टींप्रमाणेच, जाहिरात क्षेत्र देखील खूप विकसित झाले आहे. हे केवळ खरेदीदार, विक्रेते आणि व्यावसायिक यांच्यापुरते मर्यादित नाही. त्यात काळानुरूप झपाट्याने बदल होत चालला आहे. जाहिरातीचे नवीन प्रकार विकसित झाले आहेत, नवीन मार्ग आले आहेत, विपणन क्षेत्राचा विस्तार झाला आहे.

नेटवर्क मार्केटिंगचे प्रकार
नेटवर्क मार्केटिंग विविध स्तरांवर कार्य करते. नेटवर्क मार्केटिंग तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे:
१ एकल-स्तरीय नेटवर्क मार्केटिंग
२ द्वि-स्तरीय नेटवर्क विपणन
३ मल्टी लेव्हल नेटवर्क मार्केटिंग

१ एकल-स्तरीय नेटवर्क मार्केटिंग –
एकल-स्तरीय नेटवर्क मार्केटिंगमध्ये वितरक म्हणून काम करता. कंपनीची उत्पादने किंवा सेवा विकण्यासाठी तुम्ही कंपनीच्या संलग्न वितरक म्हणून काम करता. इथे तुम्ही एकटेच असता. तुम्हाला इतर वितरकांची नियुक्ती करण्याची गरज नाही आणि थेट विक्री हाच तुमच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे. Avon, एक सुप्रसिद्ध सौंदर्यप्रसाधने कंपनी आहे जी सिंगल-टियर नेटवर्किंग मार्केटिंगचा वापर करून आपल्या वितरकांद्वारे वस्तूंची विक्री करतात.

२ द्वि-स्तरीय नेटवर्क विपणन –
द्वि-स्तरीय नेटवर्क मार्केटिंग, एकल-स्तरीय नेटवर्क मार्केटिंगच्या विपरीत आहे. इथे आपण वितरक असता व आपल्या बरोबर इतर दोन वितरकांना नेमून त्यांच्याकडून कंपनीच्या थेट विक्रीचे काम करून घेता. हे दोन वितरक आपली डाउनलाइन असते. पुन्हा हे दोन वितरक आपल्या डाउनलाइनमध्ये दोन-दोन वितरक नियुक्त करतात. अशाप्रकारे हे नेटवर्क वाढत जाते.

३ मल्टी लेव्हल नेटवर्क मार्केटिंग (MLM) –
मल्टी लेव्हल नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपण कंपनीच्या वस्तु व सेवा बहू वितरकांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता. इथे एकल-स्तरीय किंवा द्वि-स्तरीय पद्धतीने नाही तर बहू वितरकांची डाउनलाइन तयार करून व त्यांच्या मार्फत कंपनीच्या वस्तु व सेवा अधिक प्रमाणात विकू शकता. यालाच मल्टी-लेव्हल मार्केटिंग असे म्हणतात. या मार्केटिंगमध्ये कंपनीचा खूप मोठा विस्तार होतो व कंपनीच्या वस्तु व सेवा यांची अधिक विक्री होते.
Amway, Modicare या सुप्रसिद्ध बहुस्तरीय विपणन संस्था आहेत ज्या आरोग्य, सौंदर्य आणि घरामध्ये नियमित लागणाऱ्या वस्तू यांची थेट विक्री करतात.

नेटवर्क मार्केटिंग कार्य कसे करते?
मल्टी-लेव्हल मार्केटिंग (MLM), संलग्न मार्केटिंग, रेफरल मार्केटिंग, कंझ्युमर-डायरेक्ट मार्केटिंग, सेल्युलर मार्केटिंग, या सर्व संज्ञा नेटवर्क मार्केटिंगचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जातात. नेटवर्क मार्केटिंग कंपन्या वारंवार विक्री करणार्‍यांचे स्तर तयार करतात, ज्यामध्ये विक्री करणार्‍यांना त्यांच्या स्वतःच्या विक्रेत्यांचे नेटवर्क नियुक्त करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. नवीन “अपलाइन” सुरू करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या विक्रीवर तसेच त्यांनी सुरू केलेल्या “डाउनलाइन” व्यक्तींच्या विक्रीवर सशुल्क कमिशन मिळते. कालांतराने, एक नवीन वितरक उदयास येऊ शकतो, जो वरच्या अपलाइनला अतिरिक्त कमिशन प्रदान करतो. नेटवर्क मार्केटिंगच्या सदस्याची कमाई उत्पादनाच्या विक्रीवर तसेच नियुक्तीवर अवलंबून असते. नेटवर्क मार्केटिंग टीममध्ये सामील होणारी कोणतीही व्यक्ती दोन प्रक्रियेतून जाते: पहिली म्हणजे प्रशिक्षण आणि दुसरी म्हणजे थेट विक्री.

१. प्रशिक्षण –
कंपनीमध्ये सामील झाल्यानंतर पहिली पायरी म्हणजे तुम्हाला कंपनीचे वितरक बनविणे म्हणजे तुम्ही आतापासून कंपनीची उत्पादने थेट विक्री करू शकता. प्रत्येक कंपनीमध्ये समाविष्ठ होणाऱ्या व्यक्तीची नोंदणी करणे व वितरक बनविणे. त्यामुळे त्यांना एक अद्वितीय नोंदणी क्रमांक प्रदान केले जाते. त्याच क्रमांकाच्या आधारे वितरक वस्तु व सेवा यांची विक्री करू शकतात. कंपनीसोबत वितरक म्हणून सुरुवात करण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी, कंपनी तुम्हाला संपूर्ण उत्पादन माहिती तसेच जाहिरात साहित्य पुरविते. बर्‍याच कंपन्या नवीन वितरकांची नियुक्ती करण्यासाठी प्रशिक्षणाबरोबरच विक्री प्रशिक्षण देखील देतात, सामान्यत: त्या त्यासाठी एक छोटी कार्यशाळा आयोजित करण्यात येते.

२. थेट विक्री
जेव्हा कंपनीने तुम्हाला विक्री, उत्पादनाचे ज्ञान आणि आवश्यक साधने आणि पुरवठा तसेच स्टार्टअप पॅकेजसह सुसज्ज करण्याच्या सूचना दिल्या असतील तेव्हा तुम्ही काम सुरू करण्यास तयार आहात. तुमचा प्रायोजक तुमच्या प्रशिक्षणादरम्यान उपलब्ध असेल आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यात व वाढविण्यास मदत करेल. प्रॉस्पेक्ट्सची यादी तयार करणे, संभाव्यतेची पात्रता घेणे, संभाव्य व्यक्तींसोबत भेट घेणे, त्यांना भेटणे आणि MLM व्यवसाय प्रस्तावाचे सादरीकरण करणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि नेटवर्क कंपनीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेण्यात त्यांना मदत करणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे. नियमितपणे सकारात्मक निर्णय घेणे हा तुमच्या विक्री प्रक्रियेचा भाग असेल.
वितरक म्हणून साइन अप करणे, उत्पादनांचे प्रशिक्षण घेणे, विक्री करणे आणि त्यांना साधने, विपणन साहित्य आणि सुरुवातीची किट पुरवणे, तसेच त्यांचे नेटवर्क वाढविण्यात मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत प्रेरणा देणे आणि त्यांच्यासोबत काम करणे ही प्रक्रिया सुरू राहते. तुम्ही तुमचे वितरक नेटवर्क कामावर घेण्यासोबतच किरकोळ विक्री वाढवण्याचा प्रयत्न करता. किरकोळ विक्रीच्या संभाव्यतेची यादी बनवण्यामध्ये तुमचे कुटुंब, मित्र, शेजारी तसेच तुमचे सहकारी, आणि तुमचे संपर्क ज्यांच्याशी परिचित आहेत, अशा इतर फर्मचा समावेश होतो. अशाप्रकारे आपण एका साध्या नेटवर्क मार्केटिंगचे व्यवसायात रूपांतर करता.

नेटवर्क मार्केटिंगचे फायदे –
नेटवर्क मार्केटिंगमध्ये वितरक सामील करण्याचे निर्बंध नसते. अगणित वितरक नियुक्त करता येतात. व्यवसाय वितरक बनविण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांसह भागीदारी करू शकतात. कारण कंपनीची विक्री वाढविण्यासाठी वितरक इतर उप-वितरकांसोबत एकत्र काम करू शकतात.
नेटवर्क कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी जाहिरातीवर अवलंबून राहण्याची मुळीच गरज पडत नाही कारण त्यांच्याकडे एक ठोस आणि शक्तिशाली वितरण नेटवर्क आहे, जे ग्राहकांशी थेट संपर्क साधु शकतात.
या कंपन्यांना वस्तु ठेवण्यासाठी स्टोरेज किंवा डिलिव्हरीचा खर्च करावा लागत नाही. कारण वितरक त्यांच्या वस्तु व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी स्विकारतात.
येथे वितरक छोटीशी गुंतवणूक करून स्वत:चा व्यवसाय याप्रमाणे वस्तु व सेवा यांची विक्री करू शकतात.
या आराखड्यामुळे वितरक त्यांच्या व्यवसायाच्या व्यवहारातून अगणित पैसे कमवू शकतात. ते स्वतःची कमाई आणि कमिशन दोन्हीमधून पैसे कमवू शकतात.

नेटवर्क मार्केटिंग कंपनीचे नियम व अटी –
१. नेटवर्क मार्केटिंगमध्ये प्रथम आपले नांव व इतर माहिती याची नोंद केली जाते.
२. नोंदणी झाल्यानंतरच आपण त्या कंपनीमध्ये वितरक म्हणून काम करता.
३. वितरक झाल्यानंतरच आपण कंपनीच्या वस्तु व सेवा यांची थेट विक्री करू शकता.
४. कंपनीच्या सेवा व वस्तु नोंदणीशिवाय विकत घेणे किंवा विकणे याचा अधिकार नाही.
५. आपण आपल्याबरोबर अगणित सहकाऱ्यांना घेऊन काम करू शकता. पण त्यांचीही नोंदणी करणे आवश्यक आहे.
६. कंपनीची जाहिरात करण्याचा अधिकार नाही.
७. सर्व अपलाइन व डाउनलाइन वितरकांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला वस्तु व सेवा यांच्या विक्रीवर कमिशन मिळते.

मी उद्योजक होणारच 

Pink-Gradient-Thank-You-Instagram-Post-2

 

१. व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा 

२. ईमेल मार्केटिंग 

३. व्हॉट्सअप मार्केटिंग 

४. यूट्यूब मार्केटिंग 

५. सुकामेवाचा व्यवसाय कसा करावा